Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखावा ? आता तरी फसू नका ...

How to choose mango


बरेच जण विचारतात कोकणचा हापुस आणि कर्नाटकचा हापुसचा कसा ओळखायचा, म्हणून हे फोटो दाखवत आहे. कोकणचा हापुस गडद केसरी रंगाचा असतो तर कर्नाटकचा आंबा हा पिवळ्या रंगाचा असतो. चवीत प्रचंड फरक आहे. कोकणचा हापुस अत्यंत गोड आणि कर्नाटक कमी गोड व तुरकट चवीचा असतो. कोकणच्या हापुसची साल पातळ असते व कर्नाटक हापुसची साल जाड असते. अनेक जण देवगड रत्नागिरी नावाखाली कर्नाटक हापुस विकतात यामुळे महाराष्ट्रातील कोकणच्या हापुसला भाव मिळत नाही व ग्राहकांची ही फसवणुक होते, याकरिता हा फरक दाखविला आहे. आपण आंबा खरेदी करताना असे पडताळून पहा आणि होणारी फसवणूक टाळा..

रत्नागिरी हापूस आंबा


तसे पण आजकाल आंबा हा दराने अधिकच असतो त्यात व्यापारी वृत्तीचे अमराठी आणि इतर लोक ह्या व्यवसायामध्ये अधिक प्रमाणामध्ये असल्याने आपली फसवणूक होण्याची शक्यता अधिकच असते. कोकणचा गंध नसलेल्या पुणे-मुंबई सारख्या शहरी लोकांना आंबा बघून तो ओळखता येणे तसे दुरापास्तच !
पण अपेक्षा आहे कि आम्ही सांगितलेल्या ह्या क्लुप्त्या तुमची फसवणूक टाळू शकतील कारण शेवट आपण पैसे मोजतो नाही का ?