Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा का ड्रायव्हर आपल्या जागेवर बसवून दिवसभर स्वतः गाडी चालवली ह्या जिल्हाधिकाऱ्याने !

Collector Would Like To This

कलेक्टरची गाडी चालवणारा ड्रायव्हर दिगंबर याने कधी स्वप्नात पण विचार केला नसेल कि त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी कुठला कलेक्टर स्वतः ड्रायव्हर  बनून सन्मानित करेल. ही  घटना घडली आहे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील . घडले असे कि श्रीकांत हे अकोला जिल्ह्याचे डेप्युटी कलेक्टर आहेत . त्यांचा ड्रायव्हर दिगंबर आहे . तो दिगंबरचा  सरकारी नोकरीचा शेवटचा दिवस होता . तो घरी बसलेला असताना अचानक श्रीकांत साहेब त्याच्या घरी आले . स्वतः डेप्युटी कलेक्टर गाडी चालवून आले होते . त्यांना बघून दिगंबर आणि त्याच्या परिवाराचा आनंद गगनात मावेनासा झाला .

इतकेच नाही तर श्रीकांत साहेब त्याला म्हणाले कि आज तुझ्या निवृत्तीचा दिवस आहे . यामुळे आज मी गाडी चालवणार आणि तू साहेबासारखा मागे बस . दिगंबर म्हणाला साहेब माझी इतकी लायकी नाही आहे . तेव्हा कलेक्टर साहेब त्याला म्हणाले कि तू इतक्या वर्ष एवढ्या कलेक्टरची सेवा केली . आज तुझ्या सरकारी नोकरीच्या शेवटच्या दिवशी मला तुझा ड्रायव्हर बनायचे आहे . तेव्हा दिगंबर  म्हणाला कि मला इतका सन्मान नका देऊ . पण कलेक्टर साहेब काही ऐकायला तयार नव्हते .
Collector Would Like To This


शेवटी त्यांनी दिगंबरला मागे बसवून स्वतः गाडी चालवत ऑफिसाला नेले . कलेक्टर साहेबांनी खास दिगंबरसाठी लाल दिव्याची सरकारी गाडीला गुलाब पुष्पांनी सजवून आणले होते . लोकांनी जेव्हा हे दृश्य पहिले तेव्हा खूप आश्चर्य वाटले . गाडीतून उतरताच कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना अभिवादन केले आणि म्हणाले कि आपले दिगंबर हे सरकारी नोकरीतून आज निवृत्त होत आहे . आज त्यांचा नोकरीचा शेवटचा दिवस आहे . यानंतर दिगंबर म्हणाले कि मी आत्तापर्यंत १८ कलेक्टरांकडे गाडी चालवली आहे . पण आज श्रीकांत साहेबांनी जो सन्मान मला आज दिला आहे तो मी आयुष्यभर नाही विसरू शकणार .