Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

आरोप चुकीचे - अक्षय कुमार आहे भारतीयच, जाणून घ्या वास्तव !

is AkshayKumar An Indian


बॉलीवूड अभिनेता अक्षयकुमार याच्या नागरिकतेवर प्रश्न उठत आहे . बऱ्याचशा बातम्यांमध्ये त्याला कॅनेडियन नागरिक असल्याचे सांगितले जात आहे . पण असं नाही आहे . स्वतः अक्षयने याचे खंडन केले आहे . एका इव्हेंटच्या दरम्यान त्याला पत्रकारांनी त्याच्या नागरिकतेवरून त्याला प्रश्न विचारू लागले . तेव्हा अक्षयकुमार याने सांगितले कि त्याला कॅनेडियन नागरिकांत मिळाली आहे पण एक सन्मान म्हणून मिळाली आहे . तो एक सन्मान आहे तुम्हाला जस वाटत तस काही नाही आहे . याचा अर्थ अक्षयकुमार हे भारताचेच नागरिक आहे .

अक्षयकुमार हे भारताचे नागरिक आहेत ही बातमी याआधी २०१६ मध्ये आली होती . यात सांगितले होते कि एका कलाकाराला लंडनच्या हिस्थ्रो येथील एयरपोर्टवर ताब्यात घेण्यात आले आणि ब्रिटनचे इमिग्रेशन अधिकारी त्यांच्या कॅनेडियन पासपोर्टविषयी माहिती मिळवत आहेत . मुंबई मिरर यांनी आपल्या बातमीत सांगितले होते कि अधिकाऱ्यांनी असे सांगितले कि कॅनेडियन नागरिक व्हिसाशिवाय ब्रिटनमध्ये पर्यटक म्हणून येऊ शकतो . जेव्हा अक्षयकुमारला विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी सांगितले कि तो म्हणाला कि मी इथे एका चित्रपटाच्या शुटिंगकरता आलेलो आहे . यासाठी व्हिसा गरजेचं असतो . त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले होते .

is AkshayKumar An Indian


भारतात हा आहे नागरिकतेचा कायदा 

संविधानाच्या अधिनियम १९५५ च्या धारा ८ अनुसार दुहेरी नागरिकत्व मान्य नाही . याचा अर्थ असा आहे कि जर तुमच्याकडे कुठल्या अन्य देशाचा पासपोर्ट आहे तर तुम्ही भारताचा पासपोर्ट नाही बाळगू शकत. भारतीय संविधानानुसार जर कोणी व्यक्ती स्वतःच्या इच्छेने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व मिळवतो तर तो भारताचा नागरिक नाही राहू शकत .