Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

छे छे गाडी चालवणारा ड्रायव्हर मन्या सुर्वे नाहीच ! जाणून घ्या वास्तव ...

manya surve with balasaheb thakre

खूप दिवसांपासून फेसबुकवर हा फोटो शेयर होत आहे ज्यामध्ये एका जीप वर छगन भुजबळ, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि काही व्यक्ती एका रॅली मध्ये आहेत असे दृश्य आहे. त्या फोटोत गाडी चालवणारा ड्रायव्हर हा कुख्यात गुंड मन्या सुर्वे असल्याचे जवळपास सर्वच लोक मानत आहेत पण ह्या फोटोचे सत्य काहीतरी वेगळेच आहे.
१९८५ साली छगन भुजबळ पहिल्यांदी महापौर झाले तेव्हा निघालेली हि रॅली असून त्या वेळी शिवसेनेचे एक शाखा प्रमुख हि जीप चालवत होते असे खात्रीशीर वृत्त आहे. पण सदर व्यक्तीचे नाव लवकरच कळेल असे देखील काही जुन्या शिवसैनिकांनी सांगितले आहे.

मन्या सुर्वेचा मृत्यू १९८२ चा तर भुजबळ महापौर झाले १९८५ साली !
म्हणजे  मन्या सुर्वेचा मृत्यू झाल्यावर तब्बल ३ वर्षांनी हा फोटो काढला होता त्यामुळे ह्या फोटो मन्या सुर्वे असण्याचे तसेहि काही कारण नाही. परंतु संबंधित व्यक्ती आणि मन्या सुर्वे ह्यांच्या दिसण्यात बऱ्यापैकी साम्य असल्याने लोकांना गैरसमज होणे साहजिकच आहे . कोण होता मन्या सुर्वे ?
मनोहर सुर्वे ( मन्या भाई ) :- हा फोटो ज्यावेळी मन्या सुर्वे ला अटक झाली त्यावेळचा खरा फोटो आहे.

तुम्ही आता Shoot out at wadala चित्रपट पाहता तो या वाघाच्या आयुष्यावर आहे. मी हे नाही म्हणत कि तो चांगला होता. तो वाईट माणूस असेल सुद्धा पण मला फक्त इतकच म्हणायचं आहे कि जर तो त्यावेळी अजून थोडे दिवस जगला असता तर आज परिस्तिथी वेगळी असती.  आज जो आपल्या देशाविरुद्ध पाकिस्तान मधून घातक कारवाया करतोय. जो आपल्या देशात ९३ साली बॉम्बस्फोट करून गेला... ज्याला पकडण्यात आज आपल्या देशाला अपयश येत आहे तो हरामखोर दाउद आज या जगात नसता... कारण मन्या सुर्वे ने त्याला १९८२ साली मारले असते. मन्या ने दाउद च्या भावाचा खून केला होता.

Manya Surve मन्या सुर्वे