Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

बघा कसे फसवतात - 'घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५०० !'पेपर मधील छोट्या जाहिरातींमध्ये एक जाहिरात सर्वच पेपरांमध्ये वाचावयास मिळते. ती म्हणजे " घरबसल्या लिखाणकाम करून आठवड्याला कमवा ७००० ते १२५००.

रिटायर झालेल्या व्यक्ती, बेरोजगार, गृहिणी हे या लोकांचे टार्गेट असते. 

मला एक सांगा, आजच्या कॉम्पुटर च्या युगात कशाला लागते हो लिखाण काम ? पण इथेच तर खरी मेख आहे. भेटायला गेल्यावर ते आपल्याला एक गीचमीड आणि अतिशय बारीक टाईप असलेले इंग्रजी पुस्तक देतात. आणि सांगतात, ह्यातील अमुक अमुक इतकी पाने आठवड्यात लिहून पूर्ण करून आणा. अमुक इतक्या चूका झाल्या तर तमुक पैसे कापणार आणि उरलेले तुम्हाला देणार. ( खरेतर काहीच देणार नाही) आणि त्यासाठी डिपॉझिट म्हणून पंधराशे जमा करावे. लिखाण कधीच वेळेत पूर्ण होत नाही. ( ते होत नसतेच) आणि मग तुम्हाला जाणवते की तुम्ही फसले गेला आहेत. तुम्ही त्यांच्या नियमानुसार तुमचे डिपॉझिट ही परत मागू शकत नाही.

आसल्या जाहिराती पासून सावध राहा. अश्या जाहिराती म्हणजे म्हणजे केवळ तुमच्या भावनेशी खेळ असतो. हे लक्षात ठेवा.