Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

मटण ४०० रु. प्रती किलो, मग १० किलोचा बोकड १८०० ते २००० पर्यंतच का कटिंगसाठी विकत घेतात ?

नॉनव्हेज म्हंटले कि डोळ्यासमोर येते ते बोकडाचे मटण ! खव्वय्ये लोकांसाठी अगदी जीव कि प्राण .. पण हे मटण आता आता तब्बल ४०० ते ४४० रुपयाने बाजारा मध्ये मिळते. पण १० किलोचा एक बोकड मात्र विकला जातो तो फक्त १८०० ते २००० रुपयांना ! म्हणजे साधारण २०० रुपये किलोला मग दुप्पट किंमतीने का बर हे मटण विकले जाते हा प्रश्न सर्वांनाच असेल. काही खाटिकांशी चर्चा केल्यावर आम्हाला जे उत्तर मिळाले ते आम्ही तुम्हाला उत्तर देतो.

जेव्हा कोणी पण खाटिकाला बोकड विकतात तेव्हा आदल्या दिवशी त्याला विकणारे खाऊन-पिऊन गुटगुटीत करतात. शक्यतो बोकड हा वजनावर विकला जातो, खाटीक लोकांच्या म्हणण्यानुसार २-३ किलो हे चाऱ्याचे वजन निघते.

जे बोकडामध्ये रक्त निघते त्याला नेहमीच गिर्हाईक मिळत नाही आणि सहसा ते वायाच जाते. जी चमडी निघते ती पण ४०-५० रुपये किलोने मात्र विकले जाते. बोकडाची मुंडी हि साधारण १ किलोची असते ती काही ४०० रुपये किलोने जात नाही. त्या पाया, फुफ्फुस, वजरी ह्या सर्व गोष्टी देखील कमी किंमती मध्ये जाते. ह्या सर्वांचे गणित जर आखले तर १० किलोच्या बोकड असेल तर ४-५ किलोच मटण निघते.

शक्यतो बोकड हा १५ किलोचा असतो ज्या योगे हे मटण वाढते आणि त्या हिशोबाने खाटीकाला पैसे मिळतात. म्हणजे सर्व नफा-नुकसानाचे गणित आपण आखले तर एका १८००-२००० चा बोकड त्यांना ७००-८०० रुपये नफा मिळतो.