PM किसानचे पैसे वाढणार..! | PM kisan yojana

0

PM kisan yojana

PM किसानचे पैसे वाढणार..! सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी या दोघांचेही 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाकडे लक्ष लागले आहे. यावेळी नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना आयकर सवलतीच्या बाबतीत दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असल्याची चर्चा आहे म्हणूनच सर्वांच्या नजरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेकडे असतील. 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारकडून अनेक लोकप्रतिनिधी आश्वासने दिली जाऊ शकतात.

PM किसानचे पैसे वाढणार..!

 सरकार शेतकऱ्यांना देऊ शकते मोठी भेट 

या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकते, असा दावा सूत्रांनी केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधीची रक्कम वाढवण्याची घोषणा करू शकतात. पीएम किसान सन्मान निधी मध्ये दरवर्षी मिळणाऱ्या 6 हजार रुपयांच्या रकमेत वाढ होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सरकार हा निर्णय घेऊ शकते.

PM kisan yojana
PM किसानचे पैसे वाढणार..!

3 ऐवजी 4 पट पैसे मिळतील 

शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिलेली रक्कम 3 ऐवजी 4 पट दिली जाऊ शकते असेही  सांगण्यात  येत आहे. यामध्ये प्रत्येक तिमाहीत  2000 रुपये देणे अपेक्षित आहे. सध्या दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये वर्ग केले जातात. मात्र बदला नंतर दर तिमाहीला 2000 रुपये दिले जातील. म्हणजेच शेतकऱ्यांना 6000 रुपयांऐवजी 8000 रुपये वार्षिक देण्यात येणार आहेत..


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)