जिल्हा परिषद भरती २०२३ संपूर्ण माहिती | Zilla parishad bharti 2023 All information

0

Zilla parishad bharti 2023 All information

Zilla parishad bharti 2023
Zilla parishad bharti 2023

Zilla parishad bharti 2023:राज्यात सर्व विभागांमध्ये भरती चालू झाल्या आहेत. मात्र जिल्हा परिषद भरतीची जाहिरात आली नव्हती, अखेर जिल्हा परिषद भरती २०२३ भरतीच्या जाहिरातीची प्रतीक्षा करण्याची वेळ संपली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत १८९०० जागां वरती मेगा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये आपण जिल्हा परिषद भरती २०२३ बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये पात्र होण्यासाठी आपली वयोमार्यादा किती असणार आहे ते आपण पाहणार आहोत. अर्ज प्रक्रिया कुठे करायची याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत तर संपूर्ण माहिती कृपया नक्की वाचा.

जिल्हा परिषद भरती २०२३

सर्व जिल्हा परिषदांकडील गट-क मधील 18 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत मार्च २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणूक आचारसंहिता, कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमी व इतर विविध कारणांमुळे परिक्षा होऊ शकली नाही. शासनाच्या यानंतर विविध विभागाद्वारे प्राप्त झालेल्या सूचनांनुसार ग्रामविकास विभागांतर्गत ही जिल्हा परिषद मेगा भरती करण्यात येत आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.०५ ऑगस्ट पासून २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्विकारण्यात येतील. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्या जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाऊन 25 ऑगस्ट 2023 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

पदाचे नाव


शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र.१: (i) विज्ञान शाखेतील पदवी   (ii) बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा १२ महिन्यांचा                       कोर्स
  2. पद क्र.२: १०वी उत्तीर्ण
  3. पद क्र.३: सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद
  4. पद क्र.४: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.५: ६०% गुणांसह १२वी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/पदवी
  6. पद क्र.६: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  7. पद क्र.७: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  8. पद क्र.८: यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  9. पद क्र.९: (i) १०वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य आरेखक कोर्स
  10. पद क्र.१०: (i) तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्स   (ii) ०५ वर्षे अनुभव
  11. पद क्र.११: (i) पदवीधर  (ii) ०५ वर्षे अनुभव
  12. पद क्र.१२: (i) १०वी उत्तीर्ण   (ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि.
  13. पद क्र.१३: (i) १०वी उत्तीर्ण   (ii) मराठी  टंकलेखन ३० श.प्र.मि.
  14. पद क्र.१४: तारतंत्री प्रमाणपत्र
  15. पद क्र.१५: (i) ०४थी उत्तीर्ण    (ii) ०२ वर्षे अनुभव
  16. पद क्र.१६: समाजशास्त्र / गृहविज्ञान/शिक्षण/ बालविकास/पोषण पदवी
  17. पद क्र.१७: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
  18. पद क्र.१८: भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र/प्राणीशास्त्र/मायक्रोबायोलॉजी पदवी
  19. पद क्र.१९: १०वी उत्तीर्ण   (ii) ITI (यांत्रिकी/विद्युत/ऑटोमोबाईल) प्रमाणपत्र
  20. पद क्र.२०: (i) १०वी उत्तीर्ण   (ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) ०१ वर्ष अनुभव
  21. पद क्र.२१: पदवीधर
  22. पद क्र.२२: (i) B.Com  (ii) ०३ वर्षे अनुभव
  23. पद क्र.२३: कृषी पदवी किंवा समतुल्य
  24. पद क्र.२४: विज्ञान,कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/सांख्यिकी विषयासह                         पदवी
  25. पद क्र.२५: (i) ५०% गुणांसह  B.A/B.Sc/B.Com   (ii) B.Ed    (iii) ०३ वर्षे अनुभव
  26. पद क्र.२६: विधिद्वारे संस्थापित विद्यापीठाची पदवी.
  27. पद क्र.२७: १०वी उत्तीर्ण +स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी                   पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी
  28. पद क्र.२८: (i) १०वी उत्तीर्ण  (ii) इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १२० श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन ४०                          श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि.

जिल्हानिहाय पद संख्या


वयाची अट:- २५ ऑगस्ट २०२३ रोजी,  [मागासवर्गीय: ०५ वर्षे सूट]

  • आरोग्य सेवक (महिला): १८ ते ४२ वर्षे
  • आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग: १८ ते ४५ वर्षे
  • आरोग्य सेवक (पुरुष): १८ ते ४७ वर्षे
  • पर्यवेक्षिका: २१ ते ४० वर्षे
  • उर्वरित इतर पदे: १८ ते ४० वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज फी: खुला प्रवर्ग: ₹१०००/-   मागासवर्गीय/अनाथ:₹९००/-, माजी सैनिक: अर्ज फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २५ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट: Click here

ऑनलाइन अर्ज: Click here 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)